Posts

Showing posts from November, 2021

शाळेची शाळा !

Image
  राज्य सरकारने काढलेल्या फतव्या नुसार; १ ली ते ४ थी च्या शाळा पुन्हा सुरु करण्यात येत आहेत.  मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने हे कदाचित योग्यही असेल; परंतु हे असे करणे किती संयुक्तिक आणि सहज आहे याचा देखील विचार झाला पाहिजे.  शाळा संचालक, पालक आणि विद्यार्थी यांच्या मानसिक, आर्थिक आणि शारीरिक बाबींचा विचार या लेखाद्वारे मांडत आहोत.  टाळेबंदीच्या काळामध्ये, अनेक शाळांना निधी अभावी, हंगामी शिक्षक, सेवक यांना कमी करावे लागले आहे. आता शाळा सुरु झाल्याबरोबर त्यांची व्यवस्था करणे हे जिकरीचे ठरेल. टाळेबंदीमुळे शाळांना शुल्क कपात देखील करावी लागली आहे, त्यामुळे आवश्यक तेवढे शिक्षक, सेवक आणि अन्य कर्मचारी पुन्हा भरती करताना त्यांच्या वेतनाचा भार देखील शाळा प्रशासनावर पडणार आहे हे निश्चित आहे.  आधीच कमी झालेल्या उत्पन्नावर चालणाऱ्या शाळांपुढे नवीन भरती म्हणजे; दुष्काळात तेरावा महिना असेच ठरू शकते. सध्या कोविडचा नवीन प्रकार (व्हेरियंट) उद्भवल्याने राज्य सरकारने नवी नियमावली नुकतीच जाहीर केली आहे.  नियमभंग करणाऱ्या व्यक्ती, व्यावसायिक, दुकानदार, संस्था यांचेकडून रु. ५००...

स्वा. सावरकर : एक प्रतिभावंत.

Image
  नाशिक येथे संपन्न होत असणाऱ्या , ९४ व्या . अखिल भारतीय साहित्य संमेल्लनावरून बराच गोंधळ माजला आहे . त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप सुद्धा होताना दिसतो आहे . अशी ही संमेल्लने खरे  तर  सारस्वतांची मांदियाळी ठरली पाहिजेत परंतु दुर्दैवाने ती राजकीय आखाडा बनताना दिसत आहेत . स्वा . सावरकरां सारख्या साहित्यिकाच्या जन्मभूमी मध्ये हे संमेल्लन आयोजित होत असताना , संमेलनाचे गीत , प्रवेशद्वार किंवा व्यासपीठ या पैकी कशातही सावरकरांना स्थान नसणे ही बाब खटकते आहे . काही सावरकर प्रेमी यासाठी निषेध , विनंती   करून अशी मागणी करताना दिसत आहेत.   पण इथे प्रश्न असा पडतो की ; ही वेळच का यावी ?  स्वा . सावरकरांच्या अन्य बाबींप्रमाणे त्यांचे साहित्य देखील काहींना पोटशूळ उठवते आहे का ? , स्वा . सावरकरांचे साहित्य विश्वातील योगदान , आयोजक विसरले तर नाहीत ना ? असे जर असेल , तर स्वा . सावरकरकरांची प्रतिभा कशी होती ? त्यांनी कोणकोणत्या साहित्य प्रकारात संपदा निर्माण केली होती ? य...