अमर वीर हुतात्मा कोठारी बंधू

                                   
                                                               ।। जय श्रीराम ।।
हुतात्मा कोठारी बंधू


तो काळ १९८९ चा होता, अयोध्या रामजन्मभूमी आंदोलनाने अवघा हिंदुस्थान भारावून गेला होता.

प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीला स्वतंत्र करून, भारत मातेच्या मस्तकी असणारा परकीय आक्रमकांचा, कलंक पुसून टाकण्यासाठी हिंदू समाज व्याकुळ झाला होता.

सप्टें १९८९ ला ठीक-ठिकाणी श्रीराम ज्योत पूजन करण्यात येत होते, याच कार्यक्रमाच्या माध्यमातून कलकत्त्याचे दोन सख्खे बंधू रामकुमार आणि शरद कुमार कोठारी या २०-२२ वर्षाच्या तरुणांनी या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला.

हे दोघे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य आधीपासून करीत होते आणि त्यावेळी ते द्वितीय वर्ष शिक्षित होते.

कोठारी बंधूनी १०० हुन अधिक ठिकाणी "श्री रामज्योत पूजन" कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

ऑक्टो १९९० ला अयोध्येमध्ये जाऊन कारसेवा करायचे ठरले मा. अशोकजी सिंघल यांनी आवाहन केले
" चलो अयोध्या ..... " (कारसेवा याचा अर्थ स्वतःच्या करकमलांनी (हातांनी) करायची सेवा).

अशोकजींचे आवाहन समजल्याबरोबर, कोठारी बंधूनी आपली नावे नोंदविली. त्यांच्या वरिष्ठांनी सांगितले की काहीही घडू शकते तरी दोघानी जाण्याऐवजी एकाने कोणीतरी जावे.

परंतु या दोघांनीही सांगितले कि आमची नावे जरी राम-शरद अशी असली तरी आम्ही राम-लक्ष्मण आहोत त्यामुळे आम्ही जे कार्य करू ते सोबतच करू. त्यांचा हट्ट आणि आत्मविश्वास पाहून पहिली ५९ जणांच्या तुकडीचे नेतृत्व त्यांच्याकडे देण्यात आले.

याच वेळी त्यांच्या घरी लग्नकार्य  होते परंतु देव देश धर्म या साठी सर्वस्वाचे बलिदान देण्यासाठी आसुसलेल्या या उभयतांनी, घर, नातेवाईक आणि भौतिक सुखे यांचा केंव्हाच त्याग केला होता.

२२ ऑक्टो १९९० रोजी कारसेवकांची पहिली तुकडी घेऊन कोठारी बंधू कलकत्त्याहून बनारसला आले, तेथून गाडीने कोलापूर पर्यंत पोहोचले. परंतु पुढील मार्ग मात्र तात्कालिक सरकारने बंद केला होता.

कारसेवकांना आता अयोध्या पायीच गाठावी लागणार होती. कारसेवक निघाले....

अश्रूधूरांचा मारा होत होता, लाठीहल्ले होत होते , रक्ताचे सडे पडत होते पण तरीही न डगमगता ही कारसेवकांची तुकडी पुढे पुढे जात होती. अखेर ३० ऑक्टो रोजी पहाटे ४:०० वाजता हे सर्वजण अयोध्येत पोहोचले.

३० आणि ३१ ऑक्टो रोजी पोलिसांचा अत्याचार सहन करत कारसेवा पार पडली ....
याच दरम्यान कोठारी बंधूनी राम जन्म भूमीवर भगवा ध्वज फडकावला....

कारसेवकांचा होणारा विजय पाहून, तात्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंहाचा तिळपापड होत होता........
कारसेवा संपवून कारसेवक फैजाबाद येथे गेले...

२ नोव्हे १९९० ...... कारसेवकांची सेना पुन्हा एकदा आयोध्येकडे निघाली....

आता मात्र सरकार खवळले त्यांनी थेट गोळीबार करण्याचा आदेश दिला.

कारसेवकांच्या तुकडीला शरयू नदीच्या पुलावर थांबवण्यात आले .....

कारसेवकांनी प्रतिकार न करता तिथेच थांबून रामधून (भजने) गाण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी त्यांना परत फिरण्यासाठी सांगितले परंतु कारसेवक राम भजनातच तल्लीन होऊन तिथेच थांबले होते..... पोलिसांनी प्रथम लाठी चार्ज केला ... परंतु कारसेवकांनी भजने थांबवली नाहीत ..... आणि अखेर गोळीबाराचे आदेश देण्यात आले....

पोलिसांच्या बंदूका आग ओकू लागल्या एकच गडबड उडाली .....

पोलिसांनी कोठारी बंधूंचा शोध घेतला त्यांना फरफटत रस्त्यावर आणले आणि .........

त्या २०-२२ वर्षाच्या कोवळ्या तरुणांवर गोळ्या झाडल्या गेल्या .... दोन सखखे भाऊ जागीच ठार झाले .....

हिंदू अस्मितेचा सूर्य तळपत राहावा म्हणून कोठारींच्या वंशाचे दिवे मालवले .... .....

" मृत्यू समोर दिसत असूनही न डगमगता केवळ देव देश आणि धर्माच्या सन्मानासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या कोठारी बंधूंना भावपूर्ण श्रद्धांजली "

आयोध्येमध्ये भव्य राममंदिराचे निर्माण करणे हीच खरी, कोठारी बंधूंसह हौताम्य पत्करणाऱ्या शेकडो कारसेवनकांना श्रद्धांजली असेल. 

Comments

Unknown said…
Salute to Kothari brothers
Jai Hind