नाच रे पोरा खड्ड्याच्या बनात…
खालील काव्यरचनेचा जीवित किंवा मृत कोणत्याही व्यक्तीशी संबंध नाही....
______________________________________________________________________________
© श्रीपाद श्रीकांत रामदासी
सर्व छयाचित्रे इंटरनेटवरून साभार .....
वैशाखाच्या वणव्यावरती... श्रावणाने धरली झारी .... आणि मग उमटलं एक काल्पनिक बालगीत ....
नाच रे पोरा.... (चाल सांगण्याची गरज आहे का ?)
नाच रे पोरा खड्ड्याच्या बनात… नाच रे पोरा नाच....
काळा काळा रोड खचला रे
चिखलात टायर फसला रे
रस्त्यावर छान छान
खड्ड्यांची कमान ...
कमानीत पडून त्या नाच ....
नाच रे पोरा खड्ड्याच्या बनात… नाच रे पोरा नाच....
गटारं सारी तुंबली रे
शाळेची बस त्यात डुंबली रे
दुरुस्तीच्या वेळी
तुला देतो गोळी
खाऊन गोळी ती नाच ...
नाच रे पोरा खड्ड्याच्या बनात…. नाच रे पोरा नाच....
पावसाच्या सरी थांबतील रे
खड्डे सारे मग ते बुजतील रे
खड्डे भरून घेऊन
विसरून जाऊन
पुढच्या वर्षी पुन्हा तू नाच.. ......
नाच रे पोरा खड्ड्याच्या बनात….. नाच रे पोरा नाच....
© श्रीपाद श्रीकांत रामदासी
Comments