पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ आयोजित निषेधसभा - वडगांव बु.


आज १५ फेब्रुवारी २०१९.....

वडगांव बु. येथे पाकिस्तानच्या निषेधसभेला संबोधित करताना, मी खालील विचार मांडले...

पाकिस्तानचे कंबरडे मोडायचे असेल तर, त्याच्या बुडावर नाही तर पोटावर लाथ मारली पाहिजे, त्यासाठी सर्वप्रथम त्याला पैसा पुरवणाऱ्या चीनशी व्यवहार कमी करावे लागतील, त्यामुळे आपण सणासुदीला जर कोणतीही चिनी वस्तू घेत असू तर सर्वप्रथम हा विचार करावा की यातून चीनला मिळणारा पैसा, हा आपल्या सैनिकांच्या मृत्यूचे कारण तर बनणार नाही ना ?

सिनेकलावंत, भाई, डॉन यांना आदर्श मानण्यापेक्षा या राष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या राष्ट्रपुरुषांना आणि हुतात्मा सैनिकांनाच आदर्श मानले पाहिजे.

आपापसात जात, वर्ण, वंश, प्रांत, भाषा यांवरून भांडण्यापेक्षा एकदिलाने राष्ट्रावरील संकट निवारण्याकरिता एकत्र आले पाहिजे.

आपल्या आजूबाजूला काही संशयित घडामोडी घडत असतील, कोणी संशयित व्यक्ती फिरत असतील तर अश्यांच्या बाबतीत चौकशी करून, पोलीस यंत्रणेशी संपर्क केला पाहिजे. नागरिकाचे रूप घेऊन जर कोणी राष्ट्रद्रोह करत असेल तर त्या बद्दल सावधान राहणे आणि जागरूक राहणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

राष्ट्रसुरक्षा ही केवळ पोलीस किंवा सैनिकांची जबाबदारी नसून ती प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे.

युद्धजन्य परिस्थिती आल्यास प्रत्येक नागरिकाने सैनिक बनायची तयारी ठेवली पाहिजे.

पाकिस्तानला मोस्ट फेव्हर्ड कंट्रीच्या यादीतून वगळण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले.

आणि त्याच बरोबर एक धक्का और दो पाकिस्तान जला दो, अशी भावना देखील व्यक्त केली.

या प्रसंगी नगरसेवक मा.हरिदासभाऊ चरवड, हेमंत दादा दांगट, संजयशेठ पवळे, संपतशेठ चरवड,
जितेंद्रजी चंपानेरकर, अप्पासाहेब येवले, योगेश देशपांडे आणि अनेक नागरिक उपस्थित होते.

सीमेवर जाऊन राष्ट्रभक्ती करणे नाही जमले तरी, सैनिकांचे मनोबल वाढेल, समाजामध्ये राष्ट्रीयत्वाचा प्रचार करता येईल, असे काहीतरी करता आले, याचे तरी समाधान आहे.


         आपलाच
श्रीपाद श्रीकांत रामदासी

Comments