स्वा.सावरकरांकडून काय शिकावे ?
सावरकरांकडून काय शिकावे ? © श्रीपाद श्रीकांत रामदासी आज २६ फेब्रुवारी अर्थात स्वा. सावरकरांचा आत्मार्पण दिन, सर्वप्रथम स्वा. सावरकरांना विनम्र अभिवादन !!! स्वा.सावरकरांच्या विचारातून , चरित्रातून आजच्या पिढीने नेमके काय घ्यावे ? " जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी " या उक्तीस आदर्श मानून प्रत्यक्षात स्वर्ग जरी मिळत असेल तरी त्याचे मूल्य , आपल्या मातृभूमीपेक्षा , राष्ट्रभूमीपेक्षा कमीच समजावे. आपले राष्ट्र आपली मायभूमी हेच आपले सर्वस्व मानून तिच्यासाठी प्रसंगी , प्राणत्याग करण्याची तयारी देखील असावी. " राखावी बहुतांची अंतरे " या उक्तीप्रमाणे जास्तीत जास्त जन संपर्क करावा. अनेक मित्र , सखे , सोबती यांना जोडले जावे , आणि त्यातून निर्माण होणारे संघटन हे नैतिक कार्यासाठी क्रियावान करावे. आपले राष्ट्र , आपला धर्म , आपली संस्कृती यांच्या सन्मानार्थ प्रसंगी संघर्ष करावा लागला तरी , न डगमगता संघर्ष करावा. असा संघर्ष करीत असताना , केवळ भावना प्रधान न राहता. स्थिर बुद्धीने आणि स्थितप्रज्ञ वृत्तीने निर्णय घ्यावेत. आपले कार्य किती मोल...